ganesh chaturti wishes in marathi

Top 93+Happy Ganesh Chaturthi wishes in Marathi

Ganesh chaturthi wishes in Marathi  :  “गणपती बाप्पा मोरया” याच जयघोशाची आपण सर्वजण खूपच आतुरतेने वाट पाहत होतो ना,तो क्षण आलेला आहे…!!! आपले लाडके बाप्पा आपल्या सर्वांच्या घरा-घरात,मंडपात आणि कॉलनीत मोठ्या थाटाने विराजमान होणार आहेत. आपल्या मनात तर ते सदैव राज्य करत असतात पण प्रत्येक्षरीत्या त्यांची सेवा करायची हि संधी कधी येते याची आपण खूप उत्कटतेने वाट पाहत असतो आणि याच आपल्या हिंदू धर्मातील सर्वात आवडत्या सणासाठी आपण खूपच उत्सुक असतो आणि सर्वांसोबत आपला हा आनंद व्यक्त करावा वाटतो म्हणूनच आम्ही तुमच्या साठी सर्वोकृष्ट असे स्टेटस आणि शुभेच्छा घेऊन आलो आहोत,आमच्या या नवीन आर्टिकल मधून Ganesh Chaturthi wishes in Marathi आणि त्याच शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये शेयर करा आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा हा गणेशचतुर्थी सण दुगुणित करूया.. !!!!!

हिंदू देवतांच्या देवतांमध्ये गणपती हे सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय देवतांपैकी एक आहेत. त्याची पूजा केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ताहि म्हणतात कारण ते प्रत्येकाच्या दु: खाचे सुखात रूपांतर करतात. ते असे देव आहेत जे प्रगती, नशीब आणि यश देतात. ते महादेवांचे पुत्र आहेत. पूर्ण महाराष्ट्र आणि जवळपासच्या राज्यात गणेशाची पूजा केली जाते.


 

|| गणपती बाप्पा मोरया ||

 

 Happy Ganesh Chaturthi wishes in Marathi
Ganesh Chaturthi wishes in Marathi image 

 

||“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे,

तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे,

त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,

हीच तुझ्या चरणी प्रार्थना”

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!! ||


|| गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,

सर्व संकटाचे निवारण झाले,

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! ||


मुलीला Propose केल्यानंतर उत्तराची जितकी

#वाट पाहिली नाही,

तितक्या आतुरतेने वाट पाहतोय आमच्या

लाडक्या गणपति बाप्पाच्या आगमनाची…!!!!


|| सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची..

गणपती बाप्पा मोरया….!!!!! ||


|| सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला,

गौरीनंदन मजसमोर मी देखिला,

तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला,

यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला,

दिशाहीन भरकटलेल्या सकलाना,

संमार्गावारी चालवी तूच गजानना,

तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना,

क्षणात दूर करी अवधी विघने नाना ||


|| बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… ||


|| “सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!! ||


|| श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधिशाची स्वारी आली,

गणपती बाप्पा मोरया! ||


|| निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना…!!! ||


|| विसर्जन करा रागाचे
विसर्जन करा द्वेषाचे
विसर्जन करा लोभाचे
विसर्जन करा मोहाचे
विसर्जन करा मत्सराचे
विसर्जन करा आळसाचे
विसर्जन करा चिंतेचे
विसर्जन करा निराशेचे
विसर्जन करा निष्काळजिचे
विसर्जन करा अतिघाइचे
विसर्जन करा कन्टाळपणाचे।
विसर्जन करा नकारात्मक विचारांचे ।
विसर्जन करा मान्यतेचे ।
विसर्जन करा वाईट सवयीचे ।
*सर्व विघ्न दूर होतील।*

*गणपति बाप्पा मोरया।* ||


|| गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली,

मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली,

आंनदाने सर्व धरती नटली,

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली..

सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! ||


|| वक्रतुंड महाकाय,

सूर्यकोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव,

सर्व कार्येषु सर्वदा…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,

आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी

केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,

नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास

चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज! ||


|| वाट पाहता बाप्पा तुझी,

वर्ष कधी सरले,

आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. ||


|| गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची,

पूजा बांधिली माणिका मोतियांची|

जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |

मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||


|| वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..!! ||


Best Ganesh Chaturthi wishes in Marathiimage of Ganesh Chaturthi wishes in Marathi

 

|| गणपती तुझे नांव चांगले,

आवडे बहु चित्त रंगले |

प्रार्थना तुझी गौरी नंदना |

हे दयानिधे! श्रीगजानना ||


|| हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या,

कोरोना सारख्या भयानक रोगापासून,

संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..

गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा…!!!!!! ||


|| माझे गणराज ….

येतील गणराज मुषकी बैसोनी,

स्वागत करुया तयांचे हसोनी,

आनंदे भरेल घर आणि सदन,

घरात येता प्रसन्न गजवदन,

देतील आशिर्वादा सेवून ते मोदका,

कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका,

जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती,

करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती,

भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती,

सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती,

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,

गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया ||


|| मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी..!!! ||


|| मोदकांचा प्रसाद केला,

लाल फुलांचा हार सजवला,

मखर नटून तयार झाले,

वाजत गाजत बाप्पा आले,

गुलाल फुले अक्षता उधळे,

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा||


|| १० दिवस मंडपात आणि

३५५ दिवस आमच्या हृदयात

राहणारा बाप्पा येतोय.||


|| बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले,

दुःख आणि संकट दूर पळाले,

तुझ्या भेटीची आस लागते,

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,

अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! ||


|| आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!! ||


|| गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! ||


||तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया ! ||


|| !! सकाळ हसरी असावी!!

!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!

!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!

!! सोपे होई सर्व काम!!

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.||


|| बाप्पा आला माझ्या दारी,

शोभा आली माझ्या घरी,

संकट घे देवा तू सामावून,

आशीर्वाद दे भरभरुन…,

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया…||


|| भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति।

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास,

घरात आहे लंबोदराचा निवास,

दहा दिवस आहे आनंदाची रास,

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ||


|| बाप्पा

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात,

आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही,

होणार जस दरवर्षी होई,

पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही,

आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ,

लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही. ||


Top Ganesh Chaturthi wishes in Marathi

|| आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!! ||


|| श्रींच्या चरणी कर माझे जुळले,

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ||


|| कितिही काढल्या प्रतिमा,

तुझ्या तरी भरत नाही रे मन,

आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ..

जेव्हा होईल तुझे आगमन. ||


|| बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…! ||


|| प्रथम वंदन करूया,

गणपति बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा”

पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता” ||


|| हे करोणा वेळ आहे तुझी,

करून घे तुझा कहर,

२२ ऑगस्ट जवळ येऊ दे मग,

बघशील आमच्या बाप्पांची लहर…

बोला गणपती बाप्पा मोरया. ||


|| सर्वांचा तू भगवंता,

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोँड..

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया…! ||


|| प्रथम वंदन करूया, गणपती बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा” पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता” तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता” सर्वांचा तू भगवंता..

कुणी म्हणे तुज “गणपती” विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड” शक्तिमान तुझे सोंड

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया…! ||


|| श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील,

सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ||


|| आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची..

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…

सर्व गणेश भक्तानां

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! ||


|| निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ||

।। ॐ गं गणपतये नमः ।।


|| परंपरा आम्ही जपतो,

मोरयाचा गजर आम्ही करतो,

हक्काने वाजवतो आणि बाप्पाला नाचवतो,

म्हणूनच बोलतो, बाप्पा मोरया मोरया

।| श्री गणेश चतुर्थीच्या आणि

श्री गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…||


|| पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप,

मोह होई मनास खूप,

ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद,

होते सदैव दर्शनाची आस,

नाव घेउनीया मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची. ||


_(_e_)_

l,l~”~l,l

“( (”

,) )

|| वक्र तुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव,

सर्व कार्येषु सर्वदा…

हैप्पी गणेश चतुर्थी! ||


Latest Ganesh Chaturthi wishes in Marathilatest image of Ganesh Chaturthi wishes in Marathi

|| देव येतोय माझा,

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…!!!! ||


|| चारा घालतो गाईला,

प्रथाना करतो गणेशाला,

सुखी ठेव माझ्या मित्राला,

हेच वंदन गणपतीला ||


|| जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”,

पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!

आतुरता आगमनाची.

गणपती बाप्पा मोरया ||


|| ऊँ गं गणपतये नमो नमः

शुभ सकाळ

सर्व गणेश भक्तांना माघी गणेश

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

गणपती बाप्पा मोरया ! ||


|| सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,

हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा! ||


|| श्रावण संपला,

रम्य चतुर्थीची पहाट झाली,

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,

आली आली,

गणाधिशाची स्वारी आली…!!! ||


|| भक्ति गणपति,

शक्ति गणपति,

सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति ||

हैप्पी गणेश चतुर्थी.


|| डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू,

आनंदमय करून चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही,

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या! ||


|| सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची,

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ,

सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची,

कंठी शोभे माळ मुक्ताफलांची,

जय देव जय देव जय मंगलमूरति,

दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती,

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा,

चंदनाची उटि कुमकुम केशरा,

हीरेजडित मुकुट शोभतो बरा ,

रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया,

जय देव जय देव

लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना

सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सादना

संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुखरवंदना ||


||तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी, ऐश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना||


|| सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला,

गौरीनंदन मजसमोर मी देखिला,

तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला,

यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला,

दिशाहीन भरकटलेल्या सकलाना,

संमार्गावारी चालवी तूच गजानना,

तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना,

क्षणात दूर करी अवधी विगने नाना ||


|| आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील,

सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना,

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ,

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ,

।। ॐ गं गणपतये नमः ।।


|| जय देव जय देव ||

मूषीकवाहना मोड़का हस्ता,

चामरा करना विलंबिता सट्रा,

वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,

विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते

हॅपी गणेश चतुर्थी!!


|| वक्रतुण्ड महाकाय सूर्य,

कोटी समप्रभ,

निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा,

गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा,

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा ||


|| हाती कडे पायी तोडे पैंजणाची,

रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,

झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये,

भक्तां घरी चालली,

सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली,

आपणा सर्व प्रिय जणांना,

माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,

हार्दिक शुभेच्छा ||


Ganesh Chaturthi wishes in Marathi for whatsappGanesh Chaturthi wishes in Marathi

|| ओम सर्वमंगल मांगल्ये,

शिवे सर्वार्थसाधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी,

नारायणी नमोस्तुते,

जेष्ठा गौरी आगमनाच्या,

आपणास व आपल्या

परिवारास हार्दिक शुभेच्छा ||


|| बाप्पा आला माझ्या दारी,

शोभा आली माझ्या घरी,

संकट घे देवा तू सामावून,

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पामोरया..मंगलमूर्ती मोरया..||


|| आज गौरी आगमन,

गौरीच्या प्रवेशाने,

तुमच्या घरात,

सुखं शांती आणि धनधान्याची,

भरभराट होऊ दे…||


॥ॐ गं गणपतये नमः॥

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया!!!!!


|| रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते,

पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते,

कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे,

धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!  ||


|| उज्वल  प्रभात,

उज्वल  दिशा,

पूर्ण होवोत,

तुमच्या आशा ,

गणेश चरणी,

ही एकच इच्छा,

गणपती बाप्पा मोरया ||


|| दाटला जरी कंठ तरी,

निरोप देतो तुला हर्षाने,

माहीत आहे मला देवा,

पुन्हा येणार तु वर्षाने..! ||

!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!


|| गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास,

घरात आहे लंबोदराचा निवास,

दहा दिवस आहे आनंदाची रास,

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास….||

!सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


|| गजानाना श्री गणराया आदी वंदु तुझा मोरया,

गणपती बाप्पा मोरया!मंगल मूर्ती मोरया,

जय गणेश..मंगल मूर्ती मोरया,

जय गणेश देवा गणपती  बाप्पा मोवरे ||

हॅपी गणेश चतुर्थी!!!


|| गजानाना श्री गणराया,

आदी वंदु तुज मोरया,

गणपती-बाप्पा-मोरया,

मंगल-मूर्ती-मोरया,

जय गणेशा ||


|| खूप अडचणी आहेत जीवनात,

पण त्यांना सामोरे जायची ताकत,

बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते ||


|| गणपतीची मूर्ती पाठवत आहे,

फॉर्वर्ड नाही करायची,

पूजा करून मोबाइल विसर्जन करायचा.

जय श्री गणेशाय नम:

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

सगळ्या मित्रांना मझयाकडून

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता,

अवघ्या दिनांचा नाथा,

बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे,

चरणी ठेवितो माथा ||


|| गणेशाच्या आशिर्वादान,

तुमच्या सर्व इच्छा  पूर्ण  होऊदे,

गणपती-बाप्पा-मोरया

मंगलमूर्ती-मोरया ||


|| तुम्ही नीट करा,

तुमचं नीट करायला बाप्पा आहे ||


Beautiful Ganesh Chaturthi wishes in MarathiGanesh Chaturthi wishes in Marathi

!! जय श्री गणेशाय नमह,

गणपती बाप्पा मोरया,

मंगलमूर्ती मोरया,

सगळ्या मित्रांना मझयाकडून..!!

|| गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| जगी ज्यास कोणी नाही,

त्यास देव आहे निराधार,

आभाळाचा तोच भार साहे,

मोरया ||


|| गणपती बाप्पा जे काही नशिबात,

वाढवून ठेवले आहेस,

ते फक्त सहन करण्याची,

शक्ती दे…..! ||


|| जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत,

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर नसेल,

त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….! ||


|| धूम्रकेतू,सुमूखा,एकदन्ता,

गाजकर्णक,लंबोदरा,विग्ञराजा,

गाणा ध्यक्षा,फळचंद्रा,गजानाना,

विनायका,वक्रतुंडा,सिद्धिविनायका,

सुर्पाकरणा,हेरंबा,स्कंदरपूरवजा,

कपिला,विघ्नेश्वरा ||

!गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!


|| गजानन तू गणनायक,

विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक,

तूच भरलासी त्रिभुवनी,

अन उरसी तूच ठायी ठायी,

जन्मची ऐसे हजारो व्हावे,

ठेविण्या मस्तक तूज पायी..||


|| फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते..

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात,

श्री गणेशा पासून होते ||


|| बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता,

नाद घुमू दे एक पुन्हा,

तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…

विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा ||


|| माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे,

जिथे मी जास्त मागत नाही,

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही ||


|| कोणतीही येऊदे समस्या,

तो नाही सोडणार आमची साथ,

अशा आमच्या गणरायाला नमन,

करितो जोडुनी दोन्ही हाथ ||


|| बाप्पा एक तूच आहेस जो,

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही,

पण साथ माझी कधी सोडत नाही ||


|| भगवान गणेशाचा अर्थ,

जी-मिळवा

अ-नेहमी

एन-न्यू

ई-ऊर्जा

एस-आत्मा &

एच-आनंद

अ-प्रत्येक वेळी!

आनंदी गणेश चतुर्थी ||


|| नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला,

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात,

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल..

गणपती बाप्पा मोरया ||


|| ओम गण गणेश नाई नमः: श्री सिद्धी विनायक नमो नमः

अष्टविनायक नमो नमः: गणपत बप्पा मौर्य ||


|| आजपासून जीएम म्हणजे

गणपती बाप्पा मोरया

आणि याचा अर्थ जी

गणेश नम ||


|| गणेशजी प्रकाशातून प्रकाश मिळवतात,

प्रत्येकाचे मन ताजे होतात,

गणेशच्या दरवाज्या,

ते नक्कीच काहीतरी मिळेल …||

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.