Birthday wishes for daughter in Marathi text

Birthday Wishes for Daughter in Marathi

गुगलवर आपल्या लाडक्या लेकीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for daughter in Marathi)शोधताय? आमच्या पेज वर शुभेच्छांचा छान संग्रह आहे तो तुम्ही पाहू शकता.

मुलगी म्हणजे घरातील लाडकं आपत्य. सर्वाना जीव लावणारी आणि त्याहीपेक्षा घरातील सर्वांचा जिच्यावर जीव असतो ती म्हणजे त्यांची लाडकी लेक. आईवडिलांसाठी मुलगी म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट असते. त्यात तिचा वाढदिवस म्हणजे आईवडील आणि घरातील सर्वच खूप उत्साही आणि आनंदी असतात. अशा लाडूबाईचा वाढदिवस आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्यात तर ती घर डोक्यावर घेईल. कारण ती सुद्धा आविडलांकडून मिळणाऱ्या प्रेमाची आणि लाडाची वाट बघत असते. असे लाड तर रोजच पुरवले जातात तरीसुद्धा मुलीचा वाढदिवस म्हटल्यावर आईवडलांचं प्रेम जरा जास्तच ओतू जात.

तसेच अशा काही मुली असतात ज्या शिक्षणामुळे किंवा कामामुळे घरापासून आणि आईवडिलांपासून दूर असतात. अशावेळी आपलं प्रेम तुमच्या लाडकी पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही तिला सुंदर चारोळ्या पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामुळे तिला कळेल कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता आणि न विसरता तिच्या वाढदिवशी सुंदर शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊ इच्छिता.

या पोस्ट मध्ये आम्ही भरपूर हृदयस्पर्शी शुभेच्छा शेयर केल्या आहेत. तुम्ही त्यातील शुभेच्छा निवडून तुमचा लाडक्या मुलीला व्हाट्सएपवर किंवा मेसेज द्वारे पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही या आधी सुद्धा हॅपी बर्थडे शुभेच्छा. (happy birthday wishes) संग्रह शेयर केला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता.

Happy birthday wishes for daughter in Marathi

Birthday wishes for daughter in Marathi
birthday wishes for daughter in Marathi

तू माझ्यासाठी अनमोल आहेस❤️
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस🙏
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा🥰
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉🎁😘

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.🥰
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.🙏🙏
🎂 🎉🎁माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा🎂 🎉🎁

🎂💥🎉
माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂💥🎉

❤️वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो❤️
❤️या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो❤️
🎂 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा..!🎉🎂

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते🌹
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे🥰
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते❤️
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू😊
माझ्यासाठी एक भेट आहे🎁
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🎂

🎂 🎉🎁 🎊 🎈आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला😇 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎊🎁🎉🎂

💐बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त 🎂 अनेक शुभेच्छा💐
💐तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे💐
💐यशवंत हो, गुणवंत होत, कीर्तिवंत हो💐
💐आणि खूप मोठी हो हाच आशीर्वाद…💐

❤️सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा❤️
❤️दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला❤️
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️
❤️माझ्या प्रिय परीला..!❤️

🎂 🎉🎁 🎊
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो
तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
🎂 🎉🎁 🎊

marathi birthday wishes for daughter

प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.
तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.
😘🎂Happy Birthday लाडुले🎂😘

💐💐🎂🎂वाढदिवसाचा सुखद क्षण, तुला आनंद देवो
ह्या वाढदिवशी तू जे मागशील ते मिळो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा..!🎂🎂💐💐

🎂 🎉🎁 🎊
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा
🎂 🎉🎁 🎊

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना💐💐

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न
येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत
उंच भरारी घे आणि आयुष्यला समृद्ध कर
🎂 🎉🎁हॅपी बर्थडे माझ्या बाळा 🎁🎉🎂

बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday wishes in marahi for daughter

🎂🎂ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय🎂🎂
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही
🎂🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂🎂

❤️ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी❤️
❤️तुझी सारी स्वप्न साकार व्हावी❤️
❤️आजचा वाढदिवस तुझ्यासाठी❤️
❤️एक अनमोल आठवण ठरावी❤️
❤️आणि त्या आठवणीने तुझं आयुष्य❤️
❤️अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा❤️
❤️वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि प्रेम❤️

आज तुझा वाढदिवस🎂
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी
कीर्ती वृद्धिंगत होत जावो😍
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
❤️वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा❤️

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना
🎂 🎉🎁वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बेटा 🎁🎉🎂

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे 😊
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आमच्या लाडुलीला उदंड आयुष्य लाभू दे 😊
🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!❤️🎂

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा
🎂 🎉🎁तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎁🎉🎂

😊सुगंधी पुष्पानी भरलेले तुझं जीवन असावे😊
सुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण तुझे आयुष्य व्हावे
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राणी❤️

🎂 🎉🎁
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या माझ्या लेकीला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा
🎂 🎉🎁

❤️व्हावीस तू शतायुषी❤️
❤️व्हावीस तू दीर्घायुषीही❤️
❤️एक माझी इच्छा..❤️
❤️तुझ्या भावी जीवनासाठी❤️
❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचायची
आज तिचा वाढदिवस
🎂 🎉लाडुले तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂

आयुष्यात एकतरी परी असावी
जशी कळी उमलतांना पाहता यावी
मनातील गुपीते तीने हळूवार
माझ्या कानात सांगावी
❤️लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

❤️कधी दुखलं काळीज आमचे❤️
❤️त्यावर हास्याचा उपाय माझी लेक❤️
❤️कधी कधी आम्हा माय – बापाचीच❤️
❤️माय माझी लाडकी लेक❤️
🎂 🎉🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎂

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
💐💐बेटा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

माझे जग तूच आहेस
माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील
प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार
देखील तूच आहेस
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि प्रेम❤️

सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे….😘
💐माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा💐

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा….
💐वाढदिवसाच्या खुपसाऱ्या शुभेच्छा💐

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला
निघालेल्या माझ्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎂 🎉🎁
हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर
चांदण्यांची गोड खळी तिच्या
ईवल्याश्या गालावर
Happy Birthday Dear
🎂 🎉🎁

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

❤️पाहून माझी गोंडस लेक ,माया मनात दाटते❤️
❤️तिला पाहत जगण्याची नवी❤️
❤️उमेद मनाला मिळते…❤️
❤️लाडकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

mulisathi vadhdivsachya shubechha

लेक हे असं एक खास फुल आहे
जे प्रत्येक बागेत फुलत नाही
माझ्या बागेत फुललं यासाठी
देवा मी तुझी आभारी आहे
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 🎉🎁

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला❤️ वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो
Happy Birthday बेटा❤️🎂

❤️तू सुखी राहावीस❤️
❤️देवाकडे एवढचं मागणं आहे❤️
❤️म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी❤️
❤️दिवसरात्र झिजणं, जगणं आहे❤️
❤️माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️

🎂 🎉🎁
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂 🎉🎁

तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे😍
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले🥰
आणि माझ जीवनच बहरून गेल😊
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे❤️
🎂माझ्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

🎂चंद्राहून गोड चांदण्या, चांदण्यापेक्षा गोड रात्र🎂
🎂रात्रीपेक्षा गोड आयुष्य, आणि🎂
🎂आयुष्यापेक्षा प्रिय माझी मुलगी आहे🎂
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा🎂

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30.दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या लेकीचा वाढदिवस
🎂 🎉🎁 🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊🎁🎉🎂

मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
💖 💐वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडके💖 💐

🎂 🎉🎁किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा🎂 🎉🎁

एक वडील म्हणून मी तुझ्यासारख्या मुलीशिवाय
माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही
आयुष्य इतके उज्ज्वल बनवल्याबद्दल धन्यवाद😘😘
माझ्या गोड परीला , वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂❤️

तुझा प्रत्येक वाढदिवस मला
तितकाच आनंद देतो,
जितका आनंद होतो जितका पहिल्यांदा
मी आई झाल्यावर झाला होता
वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️माझ्या लाडक्या लेकीला❤️

❤️ ✨🎂 🎉
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
❤️ ✨🎂 🎉

प्रिय … (मुलीचे नाव )तू आमच्यासाठी एका राजकुमारी
प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष
उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात
आम्ही तुझ्यासोबत आहोत.
🎂 🎉🎁तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎁🎉🎂

देवाने दिलेलं सुंदर दान आहेस तू
फक्त मुलगी नाही माझी शान आहेस तू
🎂❤️माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा❤️🎂

🎂माझ्या घराला घरपण आणणारी🎂
🎂आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने🎂
🎂घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या🎂
🎂माझ्या प्रिय लाडक्या परीला🎂
🎂 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂

मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for daughter in Marathi) हा वरील संग्रह तुम्हाला आवडला असेलच. अशा गोड शुभेच्छा तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या दिवशी पाठवून मुलीला भरपूर आशीर्वाद द्या. जरी तुम्ही तिला थेट शुभेच्छा देणार असाल तरीसुद्धा अशाप्रकारे तुमचा शुभेच्छा संदेश पाहून तिला खूप आनंद होईल आणि तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे हेही जाणवेल.