happy birthday wishes in marathi language text (2)

१७५ + Happy Birthday Wishes in Marathi 🎂🥳🎁🎈

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday Wishes in Marathi 🎁🎈शोधत आहात? तर मग तुम्ही योग्य पेज वर आला आहात. या लेखात, आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳 , happy birthday marathi status  शेयर केले आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा आप्तेष्टांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता.

आपल्या आयुष्यात आपण दैनंदिन जीवनात बरेच प्रसंग साजरे करू शकतो. परंतु जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असतो, तेव्हा तो दिवस त्यांच्यासाठी इतर कोणत्याही दिवसापेक्षा विशेष असतो. आपल्या सर्वांना वाढदिवस साजरे करायला आवडतात आणि चाके कापायला सुद्धा आवडतो. आपल्याला तो संपूर्ण दिवस आपल्या खास व्यक्तींच्या आसपास घालवायला आवडतो. ते कोणीही असोत आपले मित्र, आई, वडील किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य असू शकतात. आपल्या वाढदिवसासाठी ते लहान पार्टीची व्यवस्था करतात, बरेच मित्र आणि नातेवाईक आपल्याला शुभेच्छा पाठवतात. आपण त्यांना उत्तर देण्यात आणि धन्यवाद देण्यात देखील व्यस्त असतो.

जुन्या दिवसांपेक्षा आजकाल वाढदिवस अधिक खास असतात. जुन्या दिवसात, आपण वाढदिवसाचा फक्त एक केक कापायचो, परंतु आजकाल आपण आपल्या कुटुंबासह, मित्रांसह किंवा इतर कोणत्याही सहकाऱ्यांसोबत एक किंवा दोनपेक्षा जास्त केक कापतच असतो . सर्व आपल्यासाठी काही लहान पार्टीची व्यवस्था करतात. तुम्हाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. आणि अखेरीस, खूप मजामस्ती , शुभेच्छा आणि आशीर्वादांसह, दिवस शेवटी संपतो, जो आपण यापुढे विसरू शकत नाही. हा दिवस दरवर्षी निघून जातो , परंतु नेहमीच आपल्या मनात आपल्या लोकांनी आपल्या सोबत केलेलं सेलिब्रेशन मात्र आठवणीत कायमच राहत. तर तुमच्या दिवसाचा आनंद घ्या आणि होय जर तुमचा आज वाढदिवस असेल तर आमच्या कडूनही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद😁

केवळ आपला वाढदिवसच नाही तर इतरांचा वाढदिवस साजरा करणे देखील मजेदार आहे. हो नक्कीच, सेलिब्रेशन आणि पार्टी नेहमीच मजेदार असते. परंतु सर्वात आधी , आज वाढदिवस असणार्‍या त्या खास व्यक्तीला काही सुंदर शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद पाठवा. तुमच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला येथे खाली मराठी भाषेत वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा मिळतील , ज्याचा वापर तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी करू शकता. आम्ही काही सुंदर इमेजेस देखील तयार केले आहेत जे आपण सोशल मीडियावर त्यांना टॅग करून पोस्ट करू शकता किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस लावू शकता. तुम्ही दिलेल्या खास शुभेच्छा त्यांचा आनंद नकीच वाढवतील.

माझा सल्ला आहे की त्यांना रात्री 12 वाजता शुभेच्छा पाठवा म्हणजे त्या व्यक्तीला नक्की छान वाटेल. बघूया तुमच्या मित्र मंडळामध्ये प्रथम त्यांना आणखी कोण शुभेच्छा देतो ते.

Table of Contents

Happy Birthday Wishes in Marathi Language Text | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

happy birthday wishes in marathi language text
Happy birthday wishes in Marathi language
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणता ही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…
क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही …
हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा……
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, 
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ माझा आधार आहेस तू, 
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, 
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
 भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, 
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
 तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. 
हॅपी बर्थडे भावा. 
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो, 
तेव्हा तूच सोबतीला असतोस, 
खरंतर आहेस माझा भाऊ पण, 
आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. 
हॅपी बर्थडे भावा.
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. '
हॅपी बर्थडे ब्रदर.
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. 
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, 
कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. 
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, 
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, 
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. 
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, 
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, 
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
 दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
 रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, 
रडवलं कधी तर कधी हसवलंस, 
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
 हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
 कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
 हॅपी बर्थडे छोट्या भावा
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
 पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
 कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही
 कारण आज माझ्या वेड्या बहिणी चा बर्थडे आहे बर का ....
हैप्पी बर्थडे sister ...लव्ह यु वेडे 
रडवते तर हसवते पण, 
उठवते तर झोपवते पण, 
आई नसून आई सारखी करते काळजी पण ..
हैप्पी बर्थडे ताई
बहीण तर आईचा ची copy असते 
जी आई नसल्या वर आपली 
आई सारखी काळजी करते 
अशा या माझ्या Sis ..... ला Happy Wala Birthday
बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, 
आणि जी माझे सर्व प्रॉब्लेम slove करते, 
आणि तिच्या bestie सोबत setting लाउन देते, 
अशा माझ्या लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वाला बर्थडे
जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो
अशा माझ्या या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून 
बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेच्छा 
माझ्या जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, 
माझ्या वेड्या Sister ला हैप्पी वाला बर्थडे
बहीण ती असते जी आपले सर्व Secret लपून ठेवते 
पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का
पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. 
अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister
माझी बहीण माझ्याशी भांडते, 
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
 आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
 कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.. 
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.. 
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.. 
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.. 
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.. तूच आम्हाला धीर देतेस…
 तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, 
तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे 
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.
सर्वात वेगळी आहे माझी बहीण 
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण 
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही 
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई
मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, 
माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली,
 प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
 तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी 
फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा 
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
 प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो 
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
 माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच 
माझी #राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

केला तो नाद झाली ती हवा 
 कडक रे भावा तूच आहे खरा छावा 
 भावाची हवा आता DJ च लावा 
 भावाचा birthday आहे #राडा तर होणारच
आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण 
 मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
 वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
 स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे 
 पोरगी दिसली की, अररर लय भारी म्हणणारे
 दिलदार व्यक्तीमत्त्वाला आभाळभर शुभेच्छा
अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
 असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले
 अशा…ना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 शुभेच्छुक - अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना
नवा गंध, नवा आनंद 
 निर्माण करत प्रत्येक क्षण यावा 
 नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
 तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
 हे एकच खास वाक्य
 मी तुला कधीच विसरणे शक्य नाही 
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो 
 आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा 
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास 
 तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
 वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास 
 कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास 
 आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
 मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
 गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
प्रेमाच्या या नात्याला
 विश्वासाने जपून ठेवतो आहे
 वाढदिवस तुझा असला तरी
 आज मी पोटभर जेवतो आहे
 हॅपी बर्थडे
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, 
सळसळणारा शीतल वारा 
 तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!

बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू दयाळू, आश्चर्यकारक, विलक्षण, सुंदर आणि सेक्सी आहेस.
 मी तुझ्याशी लग्न केले याचा मला आनंद तर आहेच …
 पण मी खरंच खूप नशीबवान आहे कारण मला 
 तुझ्यासारखी प्रेमळ आणि सुशील बायको मिळाली…
 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिला
 जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि
 सर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.
 तुझ्यासारखी बायको मिळाली 
 मी खूप भाग्यवान आहे.
 वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये!
परीसारखी सुंदर आहेस तू
 तुला मिळवून मी झालो धन्य
 प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
 हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये! 
 तुझ्या डोळ्यातील ती चमक अन मोहकपणा मी कधीच विसरणार नाही.
 ज्याने मला तुमच्या प्रेमात पाडले. 
 माझ्या प्रिये! तू ती चमक कधीच गमावली नाहीस.
सर्वात छान दिवसाच्या शुभेच्छा! 
 आणि आशा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा
 दिल्याबद्दल खूप प्रेम
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
 हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
 चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
 प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
 हॅपी बर्थडे
तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
 वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा, प्रिये. 
 Sweetie I love you
तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
 प्रेमळ आठवणींनी भरले जावो!
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
 प्रिये! चल आणखी एक वर्ष आनंदात,
 प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
 पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
 अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
 पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
 जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. 
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
 माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
 क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
 हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
 तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
 अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
 किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
 एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
कधी रुसलीस कधी हसलीस,
 राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
 मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
 पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
 वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातील सर्व हर्ष आणले फक्त तुझ्यासाठी, 
बनवेल सुंदर आजचा प्रत्येक क्षण,
 ज्याला प्रेमाने सजवेल फक्त तुझ्यासाठी. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या जीवनाचा शेवटचा जरी दिवस असला तरी मी तुझा वाढदिवस नाही विसरणार,
 माझ्या मृत्यूनंतरही तुला ते पत्र नक्की मिळतील 
ज्यावर लिहिले असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
 तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
 #प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
 माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, 
पण माझ्यासाठी तुम्ही #माझ जग आहात. 
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत 
 नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा. 
 आपल्यावर प्रेम करणे 
 नेहमीच सोपे असते
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
 हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
 तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
 असतात त्या भावना आहेत.
 माझ्या प्रिय पतीदेवाचा
 अद्भुत जन्मदिवस,
 माझे प्रेम, माझ्या भावना,
 माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
 वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!
आज तुमचा वाढदिवस आहे आणि 
 मला असे वाटते की आपण माझ्या
 आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
 आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
 माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
 वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
 तुला Success मिळो Without any Fear
 प्रत्येक क्षण जग Without any Tear,
 Enjoy your day my Dear,
 हॅपी बर्थडे
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा 
 मला माहित आहे की, 
 आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम 
 आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
 आपण मला नेहमीच खास वाटता. 
 आज मी तुमचा हा गोड दिवस 
 खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!
माझ्या चेहर्‍यावरच हास्य कायम रहावं, 
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
 मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल. 
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल 
तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस,
 आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल 
तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, 
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, 
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. 
शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही 
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. 
हॅप्पी बर्थडे डियर!
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, 
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. 
हॅप्पी बर्थडे डियर!
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल 
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
 मी तुमची खूप आभारी आहे.
 तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न
, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, 
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, 
कारण हा तो दिवस आहे,
 ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. 
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या लाडक्या भाऊंना
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.. 💐
हॅपी बर्थडे 💐
सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹
तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण, 
लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या
 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ, 
तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे, 
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, 
भर चौकात राडा करणारे, 
पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे, 
अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!
आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
 आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
भाऊ शिवाय जमत नाय, 
भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, 
अश्याच आपल्या लाडक्या भावास 
वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा
वहिनिचे चॉकलेट बॉय,
				मुलींचे प्रपोजल reject करणारे,
				पुण्याचे WhatsApp King❤
		आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
		सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
		आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
		तसेच Avenger चे एकमेव मालक व
		पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
				प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
		या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
		शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
		College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
		अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
		मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
		मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
		मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
		DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
				लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
				कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
		मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
				यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
		देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
 रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
		हफ्त्याचे ७ दिवस
		आणि माझ्या आवडीचा १ दिवस
		तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
		भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
Happy Birthday xyz bhai 👑
😎आमचा लाडका भाऊ........
  #�.. 🚩. -------� 
CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL..🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Haker😘
👑👑 👑👑 __ यांना 🛍#पोते# भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या....❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.
NO # status No # maitrin "!! # 

ज्यादा ''English'' नही आती वर्ना 🔥 maitrin🔥 वाला ✌Status✌डालता But अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ##### भावी आमदार 
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
शुभेच्छुक :-Your Best Friend
#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय
आधी #यवतमाळ न आता #अकोलाच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩
#डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस
#Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂
#Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak
समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक
याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट
बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार
हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What's App चा #किंग🤴🏿
अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥
शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊
नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले......❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय..... म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
😍_जल्लोशआहे_   गावाचा #🎂हॅपी बर्थडे 😘
❤️ कारणवाढदिवस__ ❤️
🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!
🍷वाढदिवसाच्याहार्दीकशुभेच्छा
Happy "" Birthday |
जास्त ‘‘ 🍕English ‘‘ नाही येत नाहीतर 🍖 hot वाल 🍰 Status ठेवल असत But आता
# Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
# Happy Birthday... 🎂🎂🎂🎉🎉

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रिय आई,
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!!
जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते Happy Birthday Aai
आई,
तू माझ्या आयुष्यातील
सर्वात विशेष आहेस
आणि
तू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.
वाढदिवसाच्या खूप -खूप शुभेच्छा!!!
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!
हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे! आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे !! सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे! मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”
माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🎊माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊
आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये
सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी
व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. 💕
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎈
आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🍧
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂🎈आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈
तुझा वाढदिवस आमच्यासाठी
खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा..!🎂🎈
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🍫

बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. 
बाबा नेहमी असेच आनंदी राहा. 
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂💐माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा
आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र
कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा
त्याग करून आम्हाला आनंदी
जीवन दिले.
🎂🍨वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂🍨
मी तर माझ्या आनंदात असते 
पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात
 ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.
🎂💐Happy Birthday BaBa.🎂💐
नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण
ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
🎂🍰Happy birthday papa.🎂🍰
कधीही डोळ्यात न दाखवता
आभाळाएवढे प्रेम करणाऱ्या
वडील रुपी देव माणसाला
🎂🍨वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍨
बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa
या जीवनाचा पाया
आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा ?
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा
ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉
बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero
🎂😘वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂😘
कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,
मेहनत कशी
करावी हे तुमच्याकडून शिकावे.
बाबा आज मी यशाच्या
शिखरावर आहे ते तुमच्याच
शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.
🎂🎈Happy birthday dad.🎂

प्रेमासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉
पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सासूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

सासू असूनही आईसारखे
कर्तव्य बजावले आहे
तुमची सून असतांनाही तुम्ही मला
मुलीसारखे वागवले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासू बाई

जगातील सर्वात Perfect सासूबाईंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त
अनेक शुभेच्छा.
प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी
सासू द्यावी हीच माझी इच्छा.
सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लहान असो वा मोठे
सर्वांचा आपण करता सन्मान
प्रार्थना आहे माझी आज नेहमी
कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे आई
प्रेम म्हणजे… प्रेम म्हणजे प्रेम असतं!
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
#सासूबाई

सासूबाई वाढदिवस शुभेच्छा
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुम्हाला वाढदिवसानिम्मीत खूप सारे सुख,
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हीच श्री गणेश चरणी प्रार्थना.
आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिण
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे !
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ
नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल,
माझ्या गोड बहिणीला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण
वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते !
अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाया खूप खूप शुभेच्छा

वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!
गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb❤️🥳
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini
सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💥🌸🌻
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !
Happy Birthday Vahini Saheb

आजीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते
Happy birthday my dear grandmother
आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
हॅपी बर्थडे आजी
प्रत्येक क्षण आनंदी राहतो,
कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.
कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,
उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चालतात वाकून,
हळू हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!
आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजी तुम्ही मला दया धैर्य आणि
प्रेमाची शिकवण दिली आहे.
मी आज जे काही प्राप्त केले आहे
ते फक्त आणि फक्त तुमच्या
शिकवणीमुळे शक्य झाले आहे.
Happy Birthday My grandmother
 सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून
आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण 
दिल्याबद्दल तुमचे आभार 
देव करो अशी आजी सर्वांना मिळो 
आजी तुम्हाला तुमच्या नातीकडून 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राजकीय मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाछा

आपल्या शूर आणि निर्भय नेतृत्त्वाबद्दल धन्यवाद
मी आशा करतो की आपण नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असाल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते
आपण प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणा आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते !
एक विचारवंत आणि बुद्धिमान नेते म्हणून धन्यवाद.
मी तुमचा आदर आणि प्रशंसा करतो!
आमचा नेता म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 🎂 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂
 तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो,
तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना !

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!
 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
🎂◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
  🍰🍧🎂
 🎂🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.🎂🎂
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

हेही वाचा