47+ Best Thought of The Day in Marathi Language

Thought of the day in marathi :  Hello friends, in this article we are sharing some best thought of the day in marathi language. Lets check out the article and grab your favorite thought of the day.

When you read some good thoughts they will direct impact on your mind and you feel positiveness around you. This positivity gives us motivation to work for for dreams. Some times these positive thoughts help you to bounce back from you failure. Every line will surely heat your mind and force you to think about your goals. Helps you to reminds your goals and push you to achieve that goals.

Only action takers will achives goals so get the motivations from this article and take the action towards your goals. This thought of the day in marathi language articke will surely help you to stay motivated.

 Best thought of the day in marathi language

Image of thought of the day in marathi
 Best thought of the day in marathi language

स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,

जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,

तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.


जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडु नका…

1) विश्वास

2) वचन

3) नाते

4) मैत्री

5) प्रेम

कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..

परंतु वेदना खुप होतात….


चालणारे दोन पाय किती  विसंगत असतात ,

एक मागे असतो , तर एक पुढे असतो ,

पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याला अपमान नसतो ,

कारण त्यांना माहित असत की क्षणात हे बदलणार ,

याचच नाव  जिवन  असतं ….


एवढ्याश्या आयुष्यात खुप काही करायचं असतं.

पण हव असतं तेच मिळत नसतं.

हव तेच मिळाल तरी, खुप काही हवं असतं.

चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ रिकामंच असतं……


कळत नकळत आयुष्यात खूप काही घडून जातं

अळूवावरचे पाणी देखील अलगद ओघळून जाते….!


जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि,

पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि

रबराला एवढाही वापरू नका कि,

जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल….!


शब्दांविना जगणे म्हणजे श्वासाशिवायच जगणं झालं ,

चमकणाऱ्या  नक्षत्रांनाही शब्दांनीच तर जीवन दिल…!


Good thought of the day in marathi

Good thought of the day in marathi
Good thought of the day in marathi

आयुष्यातील आठवणी चित्रात उतरवता आल्या असत्या तर किती बर झालं असतं,

चित्रात स्वतःच स्वतःला तुझ्याशि कायमच जोडून घेतल असतं…

आयुष्यात घडलेल्या चुका पुसता आल्या असत्या तर किती बर झालं असतं,

दूर जाणे इतके दुखावलं तर नसतं…

जड झालेलं आयुष्य हवं तेव्हा संपवता आलं असतं…


जिवन हे एक गाव आहे ,

ज्याचं  आयुष्य हे एक नाव आहे ,

मातीतच जगुन पुन्हा या मातितच मरायचं आहे ,

पण मरणानंतर ही उरेल असं काही तरी करायचं आहे…!


कधी हसवतात , कधी रडवतात,

क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,

पानांसारखे पडत असतात….!


आशा ही निराशेची एकुलती एक सखी आहे,

आशा असते बोलकी ,निराशा मात्र  मुकी आहे….!


जी माणसं हवीशी वाटतात,ती कधीही भेटत नाहीत…

जी माणसं नकोशी वटतात त्यांचा सहवास संपत नाही…

ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही…

जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही…

जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो…

जीवन हे असंच असत त्याच्याशी जपून वागांव लागतं….!


फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,

परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगुन कित्येक हदय जिंकत,

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,

तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हदय जिंकत रहा…!


जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.

पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे.

दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि

तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.

विचार ही एक विलक्षण शक्ति असून,

तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य  तुमच्या विचारात आहे,

म्हणून विचार बदला..म्हणजे नशीब बदलेल…!


Positive thought of the day in marathi

Image of thought of the day in marathi
Positive thought of the day in marathi

आयुष्याच गणित सोडवतांना, सांगा काय करायचं….!

चिन्ह तर सगळेच दिसतात, नेमकं गुणायचं की भागायचं….!!

खरचंच काही वेळा, गणित अवघड असं येत….!

आपण करतो बेरीज, नी सार वजा होवून जात….!!


जन्मभर जळल्यावर मेल्यावर पण जाळतात,

लाकडापेक्षा माणसंच लाकडाचे गुणधर्म पाळतात…!


पाकळ्याच गळणं म्हणजे फुलाच मरण असतं,

मरताणाही सुंगध देण यातच आयुष्यच सार असतं,

असं  आयुष्य जगण म्हणजे खरचं सोन असतं,

पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले,

तर हे जगण सोन्याहुन पिवळ असतं…!


वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देणं,

आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे,

मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे,

मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥

आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा..


आयुष्य  हॆ  पण  एक रांगोळीच आहे.

ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले,

तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते…!


आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ,

चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं,

पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं,

यावर आपलं यश अवलंबून असतं…!


आयुष्याच्या या वाटेवरती असतात संगती सर्व सखे-सोबती,

एके दिवशी जातात सोडून अशाच एका वळणावरती….

आयुष्य हे झगडायचे असते ,असेच एकट्याला पार करायचे असते,

आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं,अंधारमय जीवन जागायचे नसतं….!


Beautiful thought of the day in marathi

iamge of thought of the day in marathi
Beautiful thought of the day in marathi

जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,

एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील ,

कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते ,

आज आहे तसेच उद्याही राहील …!


आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळकाप्रमाणे येतात आणि जातात,

पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ,हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात,

ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..!


ठेचा तर लागत राहतीलच, ती पचवायची हिम्मत ठेव.

कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या  माणसांची तु किम्मत ठेव…!


आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!

प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षण भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..!

आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..!


हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते,

कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते,

जिवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते…!


शब्द , पूर आणि डोळे सगळे शेवटी निमित्तच रे,

मरण्याआधी आनंदासाठी कसे जगायचे याचेच निष्फळ प्रयत्न रे..!


आयुष्य सोपं नसलं तरीही चालेल; पण ते पोकळ असू नये..!


Motivational thought of the day in marathi

Motivational thought of the day in marathi

आयुष्य म्हणजे प्रेम फक्त नसते,

हृदय म्हणजे नुस्ते गेम नसते,

काढून देणे काही सोपे नसते,

पण काढल्यावर जगणे कठीण असते…


किती बरे झाले असते ना स्वप्नाचे दार चावी लावून स्वप्न बघता आली असत त,

गोड स्वप्न कधी तुटलीच नसती,

किती बरे झाले असते ना स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला कधी पण भेटता आले असते तर,

एकेकाळी तुटलेली नाती आयुष्याभरा करता नाही तर काही क्षणापुरता सांभाळिली असती..


तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण ,

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवून दिले जातात ….1


आपल्या जीवनाचे ध्येय है सुख नसुन सत्य असायला हवे..!


वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो,

कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही…

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही.

असेच वेळेचे पण आहे,

एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा….!


जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,

तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ठ होत नाही,

जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते,

परंतु ,जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते.


आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं..

आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं..

पंचमी श्रावणातली आहे जर रंगता आलं..

मदिरा ओठातली आहे जर झिंगता आलं..

स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं..


Inspirational thought of the day in marathi

thought of the day in marathi 5 (1)
Inspirational thought of the day in marathi

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं,

आयुष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,

प्रेम असं द्याव की घेण्याराची ओँजळ अपुरी पडावी,

नाती अशी जपावी की ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी…


आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात,

विश्वास हा काचेसारखा करतो एकदा तुटला कि,

मग कितीही जोडला तरी त्याचा तडा शेवटपर्यंत राहतोच..!


सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात,

खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही,

अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही,

सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते,

शेवटी आपण एकटेच असतो आणि..

सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी….!


आठवते मला ती शाळा, आठवतो तो फळाआठवते शाळेत जाण्यासाठी होणारी घाई,

उशिरा आल्यावर ओरडणाऱ्या या बाई, आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे दिलेले ते रट्टे,

शाळेतले ते कट्टे,आठवते मधल्या सुट्टीची ती बेल,

खेळून कसा जायचा तो वेळ,आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,

अभ्यासाचा वाटणारा तो कळस, आठवते ती घरी जाण्याची घाई,

आपली घरी वाट पाहणारी ती आई…!


मि हरलो म्हणु नकोस ..या वेळी हरलोय म्हण ..

पुन्हा जग जिंकण्यासाठी ..येतिल कीतीतरी क्षण ..

एकटा उरलो म्हणु नकोस ..सध्या एकटाआहे म्हण ..

आयुष्य संपले नाही अजुन ..येतिल कीतीतरी क्षण .. !!

मि थकलो म्हणु नकोस ..जरा दम घेतोय म्हण ..

पुन्हा झेप घेण्या साठी ..पेटुन उठेल एकक कण ..

आयुष्य संपले नाही अजुन ..येतिल कीतीतरी क्षण .. !!

जीवन सुंदर आहे ते जगात आले पाहिजे….!!


कधीकधी निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते

प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर चुकत जाते….

सोडवतांना वाटते सुटत गेला गुंता पण, प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते….

दाखवणाऱ्याला पण वाट माहित नसते,चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरवून जाते….

दिसतात तेवढ्या सोप्या नसतात काही गोष्टी,

जेव्हा घडतात तेव्हा आयुष्यकाय असते याची प्रचीती येते


दिवस हे इवल्याशा पाखराप्रमाणे असतात, येतात आणि भुर्रकन उडून जातात,

परंतु मागे ठेवतात आठवणींची पिसे काही काळी,काही पांढरी, काही मऊ,काही खरबरीत,

आपण जमेल तेवढी उचलायची त्यांना घेऊन बनवायची एक सुंदर चटई,

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी.


खरं जगाव लागत,खोट्या हास्याच्या पडद्यावर खर दु: लपवाव लागत

कर्तव्याच् या नावाखाली स्वत:ला राबवाव लागत

दुस~याला खुश ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागत

खुप प्रेम आसुनही नाही अस दाखवाव लागत


उपदेश द्यायला सगळेच असतात मात्र समजून घेणार कोणीच का नसत,

सुखात सगळेच सहभागी होतात पण दुखत मात्र अदृश्या का होतात ,

जिवंत असताना कोणीच जवळ नसत मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात ,

हे आयुष्या अस का असत जिथे गरज असताना

कोणीच का नसत…???? ??


एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी..,

पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी

प्रेमकरण्यासाठी आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी…!!

माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,

माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,

म्हणून आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका…!!


नेहमी असते तक्रार,मिळालेल्या सुखद क्षणांची खुशी नसते,

सगळे काही मिळाले तरी आयुष्यात प्रत्येक वेळी कशाची ना कशाची कमी भासते,

एक क्षण पुरेसा असतो,आयुष्यतले सुख समजून घ्यायला,

पण मिळालेल्या आयुष्याची कधी किंमत नसते,

जेव्हा येतो यम दारात मग मात्र नाही जगलेल्या प्रत्येक क्षणांची उणीव भासते…!!!!


असं वाटतं आयुष्य इथेच संपून जावं….

तिळतिळ मरण्या पेक्षा क्षणात मरण यावं…..

माझ्या या फुटक्या नशिबात लिहलेल्या

सुखाने आयुष्य तिचं फुलासारखं फूलावावं..

तिच्या साया वेदना तिच्या मनातलं सारं दुःख

माझ्या भाग्यरेषेत देवा रेखाटलं जावं

असं वाटतं आयुष्य तिच्या नावे करुन टाकावं..


We hope you love this good thought of the day in marathi article. Share this and for more motivation check our site we regularly post new status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *